नवाब मलिक यांना जेजे हॉस्पिटल मधून डिस्चार्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेले जाईल. नवाब मलिक यांचे कार्यालय त्यांना 25 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यामुळ मलिक यांना पुन्हा इडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
काय आहेत मलिकांवर आरोप ?
नवाब मलिकांवर कुख्यात गुंड दाऊत इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत, तसेच दाऊदची बहीण हशीना पारकर हिच्याकडून कवडीमोलाने जमीन खरेदी केल्याचा आरोप तसेच दाऊदला पैसे पुरवल्याचा आरोप नवाब मलिकांवर आहे. दरम्यान, सलीम पटेल याच्याशी २००५ मध्ये जमीनीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केला असताना त्यांचा दाऊदशी संबंध पोचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. यात तथ्य नाही ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे, त्या जमीनीचा व्यवहार करताना रितसर मुद्रांका शुल्क भरुन २००५ मध्ये व्यवहार झाला. आणि २००७ मध्ये सलीम पटेल बॉम्बस्फोटात आरोपी होता. मग त्या व्यवहाराशी कसा संबंध जोडता असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना आज सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेले जाईल. नवाब मलिक यांचे कार्यालय त्यांना 25 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.