संभाजीराजेनां पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफ़ा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान काल रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
अशातच आज शेगाव येथील शिवाजी चौकात एका १२ वर्षीय मराठा मुलाने उर्जामंत्री नितीन राऊतांचा (Nitin Raut) ताफा अडवला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा ताफा अडवला.
दरम्यान हा ताफा अडवून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं याबाबतचं नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आलं आहे. राऊत दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर असून हा ताफा अडविल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.