भावी पिढीच्या सुदृढ आरोग्यासाठी बालकांना पोलिओ डोस द्या :- जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 फेब्रुवारी :- भावी पिढीचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस आवश्य पाजावा, पोलिओ डोस पासुन एकही बालक वचींत राहु नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार यांनी केले आहे.
शहरातील नागरी उपकेंद्र पाटीपुरा येथे आज पल्स पोलिओ मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार यांचे हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, यवतमाळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी, आर.एम.ओ. डॉ. मनोज तगडपल्लीवार, लसीकरण अधिकारी डॉ संजय पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ क्रांतीकुमार नवंदीकर, डॉ. विजय अग्रवाल, डॉ प्रिती दुधे, यशवंत पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहेाड यानी आरोग्य विभागाने ज्या प्रमाणे कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य केले त्या प्रमाणे पोलीओ मोहिमेत सुध्दा आपण चांगल्या प्रकारे काम करणार असल्याचे सांगीतले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात 2352 व शहरी 305 असे एकुन 2657 पोलीओ बुथचे माध्यमातुन, तसेच ग्रामीण 215 व शहरी 88 असे एकुण 303 ट्रांझिट टिम आणी ग्रामीण 117 व शहरी 10 असे एकुण 127 मोबाईल टिम द्वारे 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकाना पोलिओ लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि जे बालक काही कारणास्तव आज पोलिओ डोस पासुन वचिंत राहीले असतील त्याचेकरीता दि 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आय.पी.पी. आय. अंतर्गत घरोघरी भेट देउन लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी पोलीओ लस घ्यावी.
पल्स पोलिओ मोहिम यशस्वीतेकरीता जिल्ह्यात ठिक ठिकाणी विविध पदाधिकारी,रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष , सभापती, संरपंच याचे हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमे करीता जिल्हा स्तरावरून शिक्षण ,बालकल्याण, आरोग्य,महावितरण,व राजस्व इ. विविध विभागाचे सहकार्य घेण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यानी केले तर आभार हर्षलता गायनार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपकेंद्रातील डॉ.प्राची चक्करवार,शीतल तडस, निता ञिवेदी, के.व्हि.कुलकर्णी, के.पी.चव्हाण, कृष्णा ढोले , धिरज पिसे, तेजस्वीनी नगराळे, प्रीती बागडे, संगीता गजभिये, मनिषा तिरपुडे, अल्का शेख, संदिप कुटे उपस्थित होते.