चौकशी दरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात ; नवाब मालिकांविरोधात ईडी अधिकाऱ्याची तक्रार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही त्यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.
तपासात असहकार्य!
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने यापूर्वीच त्यांना यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करन देण्यास परवानगी दिली होती. मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते प्रश्नांची उत्तर देण्यात टाळाटाळ करतात, अशी ईडी अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचे समजते.
मुलाला चौकशीसाठी बोलाविणार ?
ईडी मलिक कुटुंबीयांना आणखी एक धक्का देण्याच्या विचारात शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून मलिक यांचे पूत्र फराझ मलिक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराझही या व्यवहारात सहभाग होते. मलिक यांचे बंधू अस्लम मलिक आणि फराझ मलिक हे जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसीना पारकरच्या घरी गेले होते. हा जमिनीचा सौदा 55 लाख रुपयांना झाला होता. फराझ यांनी हसीन पारकर यांचा पाच लाख रुपयांचा धनादेश आणि 50 लाख रुपये रोख दिले होते. त्यावेळी पारकरचा सहकारी सलीम पटेलही त्याठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे आता या सगळ्याची माहिती घेण्यासाठी ईडीकडून फराझ यांची चौकशी होऊ शकते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..