मोठी बातमी ; ईडीच्या धाड़ीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. ईडीनं राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर सुरू केलेल्या कारवाईबाबत आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे नेमकं काय म्हणाले?
एका दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. इतर राज्यांत ईडीला काम नाही का?, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवरून संतप्त सवाल केला.
“बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे, महाराष्ट्रात गांजाची शेती फुललेली आहे, घराघरात टेरेसमध्ये गांजाच गांजा आहे असं म्हणून महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात
तसेच पुढे म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून उपयोग का करत नाही? महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
दरम्यान, शिवसेनेकडून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? अशी विचारणा केली असता त्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला. “आम्ही जे प्रयत्न करतोय, ते देशासाठी करतोय. संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. एवढ्या वर्षांचं स्वप्न साकार झालं, केंद्रात सत्ता मिळाली. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….