एसटी विलिनीकरणावर तोडगा नाहीच , संपाचा तिढा कायम ; उच्चस्तरीय समितीचा अहवाल जाहीर करण्यास राज्य सरकारचा “या” कारणामुळे नकार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी विलिनीकरणाबाबत (MSRTC Merger In State Government) उच्चस्तरीय समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मांडली आहे. अहवाल जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला आहे. हा संप मागे घ्याव यासाठी अनेकदा राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. तर, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
उच्चस्तरीय समितीचा जो अहवाल आहे तो आम्ही जाहीर करू शकणार नाही. कारण, अहवाल जाहीर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी गरजेची आहे. असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आंदोलक एसटी कर्मचारी आता नेमकी काय भूमिका घेणार हे सगळं मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल उघड झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरू शकते. समितीचा अहवाल त्यातील मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या आर्थिक बाबी लक्षात घेता, अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेट समोर ठेवण्यास आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली गेली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….