मनसेचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार
सध्या मुंबईत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अनेक निर्णयही घेताना दिसत आहेत.
या निवडणुकीत मनसेनेही चांगलीच कंबर कसली आहे. (Maharashtra Navnirman Sena) दरम्यान, यंदाचा मनसेचा १६ वा वर्धापनदिन पुण्यात (Pune) होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर (Mumbai) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या ९ मार्चला मनसेचा १६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमिवर मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे हा भव्य वर्धापनदिनचा सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांत पुणे महापालिकेच्या (Pune) निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता या वर्धापन दिनानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….