हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर सुटकेच्या आनंद ; युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारताकडे रवाना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झालंय. यामुळं भारताचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. रशियानं युक्रेन विरोधात सुरु केलेल्या हल्ल्यांचा आज दुसरा दिवस आहे. रशियानं युक्रेनच्या हवाई ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत. रशियाच्या हल्ल्यात प्रवासी विमानावर हल्ला होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते या कारणामुळं युक्रेन ची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्र सरकारनं यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे यूक्रेनच्या चेरनिवत्सीतून विद्यार्थ्याची पहिली तुकडी युक्रेन रोमानिया बॉर्डरकडे रवाना झाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ल्यीव आणि चेरनिवत्सीमध्ये कॅम्प लावला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाचे अधिकारी ल्यीव आणि चेरेनीवत्सीमध्ये उपलब्ध असतील, असं सांगण्यात आलं आहे. तर, रशिया भाषा बोलता येणाऱ्या अधिकाऱ्यांना पश्चिम युक्रेनमध्ये पाठवण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे कॅम्प जिथं आहेत. तिथं भारतीय अधिकारी पोहोचतील.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना हंगेरी आणि रोमानियामार्गे यूक्रेनमधून सुरक्षित मायदेशी आणण्यात येणार आहे. युक्रेनमधून रोमानियाकडे रवाना होताना भारतीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. भारतीय विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात धरुन आनंद व्यक्त केला.
दरम्यान,महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका करावी या मागणीसाठी पत्र लिहिलं असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….