अखेर पीएम मोदीनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांना लावला फोन आणि म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्याकाही दिवसांपासून युद्धाचे ढग जमा झाले होते. पण आजपासून प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियानं युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवलं असून युद्धासाठीची सर्वप्रकारची तयारी त्यांनी सुरु केली आहे.
ठिकठिकाणी सैन्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. युक्रेनमधील परिस्थिती चिघळली असून युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी भारताकडे मध्यस्थीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी भारत सरकारकडे रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्याविषयीची भूमिका घेण्याची विनंती केली होती.
त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना फोन लावला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेनच्या अलीकडील घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
पुढे पंतप्रधान मोदींनी हिंसाचार त्वरित थांबवण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताची असलेली चिंता व्यक्त केली. तसेच सांगितलं की या भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे आणि भारतात परत आणणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यां दोघांनीही या फोन कॉलमध्ये मान्य केलंय की, त्यांचे अधिकारी दोन देशांमधील मुत्सद्दी हितसंबंधांच्या मुद्द्यांवर नियमित संपर्क ठेवतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….