1200 कोटीचा घोटाळा लवकरच जनते समोर आणणार :- आ.रवि राणांचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- अमरावतीच्या पालकमंत्र्यांचा बाराशे कोटींचा घोटाळा लवकरच उघड करणार असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. मी जिल्ह्यात उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री छिन्नी हातोडा वापरून हटविण्यात आला, असा आरोप राणा यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर केला.
पुतळा हटविण्याच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी एक मोर्चा काढणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल. असे भाकीतही राणा यांनी वर्तविले आहे. दिल्लीहून आलेले आमदार राणा नागपूर विमानतळावर उतरले. विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी हे भाकीत वर्तविले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहे. महाराष्ट्राचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना लोकप्रतिनिधी कायदा कलम अ अंतर्गत चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक यांनी दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड केला आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत वर्तविले.
आमदार राणा दिल्लीला गेले होते. ते दिल्लीत असताना त्यांच्या विरोधात कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ट्रान्झिट बेल मिळाल्यानंतर आमदार रवी राणा विमानाने नागपूरमध्ये आले. नागपूर विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी राज्याविषयी एक मोठी भाकीत वर्तविले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….