एसटी संपावर हायकोर्टात सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती.
या समितीने आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला असून, त्यावर आज सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारने हायकोर्टासमोर बाजू मांडली.. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी सोडल्यास इतर सर्व मागण्या मान्य केल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं.
दरम्यान, समितीने आजच हायकोर्टात आपला अहवाल सादर केला. त्यामुळे हा अहवाल वाचनासाठी वेळ मिळावा, म्हणून न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी घेण्याचा निर्णय दिला. आता एसटी संपावर नि विलिनीकरणाच्या मागणीवर येत्या शुक्रवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे..
आता कामावर या..
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, की उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांचा अहवाल आज वकिलांमार्फत सादर केला. अहवालाची एक प्रत कामगारांच्या वकिलांना दिली आहे. कोरोना काळात ज्यांनी काम केलं, त्यांना भत्ता दिला, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये दिले. विलिनिकरणाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाकडे दिला आहे. त्याचा अभ्यास करून पुढचा निर्णय देऊ.
शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. एसटी संपाचा विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावं, लाखो लोकांना त्रास होतोय, तो कमी करावा, एसटीचं नुकसान करु नये, असं आवाहन परब यांनी केलं.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….