“जो पर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहे तो पर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- आज संपूर्ण राज्यभर आणि देशभर शिवजयंती उत्सव जोमानं साजरा केला जात आहे. राज्यभर शिवजयंती निमित्तानं कार्यक्रम पार पडत असलेले पहायला मिळत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही. सध्या फडणवीसांनी केलेल्या या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.
फडणवीस यांनी या भाषणाचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुढे ते म्हणाले की, शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित केला.
दरम्यान, राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भव्य नजारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे शिवमय वातावरण झाल्याचं पहायला मिळत आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….