अखेर ठरलं पंतप्रधान मोदी “या” दिवशी येणार पुण्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात मेट्रोच्या दोन टप्प्यांसह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे.
बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपच्या अंगात दहा हत्तींचे बळ येणार आहे.
यापूर्वी पंतप्रधान मोदी हे २८ जानेवारी रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. यात पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन त्यांच्या दौऱ्याची तयारीही जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला होता.
महापौर मुरलीधर मोहोळ- मेट्रोच्या उद्घाटनासाठी मोदी पुण्यात येणार असल्याने भाजपने त्याचबरोबर संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन यासह इतर कार्यक्रमांचा यात समावेश असेल.अशी माहिती मुरलीधर मोहोळ महापौर यांनी दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….