गेल्या 24 तासात 21 पॉझिटिव्ह ; 54 कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1751 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 189
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 18 फेब्रुवारी :-. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 21 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 183 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 189 झाली आहे. त्यातील 12 रूग्ण रूग्णालयात तर 177 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 970 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 21 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 949 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79006 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77015 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1802 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 21 रूग्णांमध्ये 9 महिला व 12 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील तीन, बाभुळगाव चार, दिग्रस एक, घाटंजी चार, नेर एक, राळेगाव दोन, वणी एक, यवतमाळ तीन व इतर शहरातील दोन रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 35 हजार 633 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 56 हजार 588 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.45 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.16 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1751 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1751 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 772 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’