नारायण राणेंचं धक्कातंत्र ; मतदार यादीतून नाव वगळूनही मुलगा जिल्हा बँकेवर संचालक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अतिशय गाजली होती. या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी किंगमेकरची भूमिका बजावली होती. निवडणुकीआधीच तत्कालीन संचालक मंडळाने राणेंचे नावच मतदार यादीतून वगळले होते. आता हेच राणे बँकेवर संचालक म्हणून निवडले गेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या खेळीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद बाजी मारली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीआधी राणेंचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते. त्यांची थकबाकी असल्याचे कारण यामागे दिले होते. आता नारायण राणे यांनी सगळ्यांनाच धक्का देत नितेश यांची बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड केली आहे.
स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निश्चित केले होते. आज जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणेंची निवड करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँकेच्या मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचे नाव आल्यामुळे ही निवडणूक गाजली होती.
जिल्हा बँक निवडणुकीत आमदार नितेश राणे किंगमेकर च्या भूमिकेत होते. आणि आता आमदार नितेश राणे स्वतः जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर नारायण राणेंना हा आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीला आमदार नितेश राणे जिल्हा बँकेत उपस्थित होते. या वेळी त्यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दळवी हे नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात दळवी हे आरोपी आहेत. त्यांनी यातून शिवसेनेला डिवचल्याचे मानले जात होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणेंच्या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकाने पराभव केला होता.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….