संसद परिसरात लकिशा बंजारा यांचा पुतळा उभारुन बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा द्यावा :- खासदार बाळु धनोरकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ : लोकगीते व लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेला बंजारा समाज पुरातन काळापासून घरदार सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. एस. टी, एस. सी, ओबीसी, व्ही. जे. एन. टी या प्रवर्गात विखुरला आहे. बंजारा भाषा संपूर्ण भारतात एक आहे. त्यामुळे या भाषेला संविधानातील ८ व्या सूची मध्ये समाविष्ट करून या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यासह अन्य प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित करून आवाज उठवला.
संसद भवन ज्या जागेवर उभे आहे. ती जागा बंजारा समाजाचे लकिशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. याकडे खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. बंजारा समाजाच्या या भूमीशी भावनात्मक जवळीक लक्षात घेता या ठिकाणी दानवीर लकिशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. भारतात बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट करून सर्वागीण विकासाच्या मार्ग मोकळा करावा व घटनेच्या ८ व्या सूचित बंजारा भाषेचा समावेश करून राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांच्यासह बंजारा समाजातून करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात विकासाच्या मुख्य प्रवाहात येता येणार आहे.
संसद भवन ज्या जागेवर उभे आहे. ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे. बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट समावेश करावा, बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा.
बाळू धानोरकर, खासदार आर्णी चंद्रपूर मतदार संघ
संसद भवन ज्या जागेवर उभे आहे. ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे, बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट समावेश करावा, बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..