महापालिकेच्या सभेत बसपा विरुद्ध एमआयएम खडाजंगी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती महानगरपालिकेची आजची शेवटची सर्वसाधारण सभा आज मनपा मध्ये होत आहे. मात्र, या शेवटच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला आहे. बसपचे नगरसेवक चेतन पवार व एमआयएमचे नगर सेवक अब्दुल नाझिम अब्दुल रउफ यांच्या खडाजंगी झाल्याने सभागृहाचे वातावरण तापले आहे. अब्दुल नाझिम अब्दुल रउफ हे एका प्रश्नाला उत्तर देत असतांना त्यांनी चुकीच्या शब्दाचा वापर केला. त्यामुळे, एम आयचे नगरसेवक अब्दुल नाजिम हे सभागृहात असे अपशब्द का बोलले, यावरून बसपचे नगरसेवक चेतन पवार त्यांच्या अंगावर गेले. त्यामुळे, एकच गोंधळ निर्माण झालेला आहे.
तर, सभागृहातील हा गोंधळ प्रभाग रचना व कचऱ्याच्या कंत्राटदारा वरून हा घडला आहे. दरम्यान सभागृहाच्या पवित्र ठिकाणी अश्लील शिवीगाळ सुद्धा करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. तर, विशेष म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादही यावेळी बघायला मिळालेला आहे. कचऱ्याचे कंत्राटदारावरून झालेल्या या वादमुळे जेष्ठ नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..