औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरणावरुन राजकारण तापले ; कराड-खैरे समोरा-समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबादमध्ये पुन्हा नामांतरणाचे राजकारण पेटले आहे. आता चिकलठाणा विमानतळाचे संभाजी महाराज विमानतळ असे नामांतरण करावे, यावरुन भाजप व शिवसेना आमने-सामने आले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड बुधवारी (ता.१६) औरंगाबादमध्ये आले. या प्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. औरंगाबादच्या विमानतळाच्या नामांतरासाठी माजी केंद्रीय उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी चर्चा केली असल्याचे कराड यांनी सांगितले. देशातील १३ विमानतळांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झाला असून यात राज्यातील कोल्हापूर, शिर्डी विमानतळांचा समावेश आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अज्ञानी आहेत.
त्यांना याबाबत कल्पना नसल्याने त्यांनी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली, असा टोला कराड यांनी लगावला. शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असा सल्ला त्यांनी खैरे व शिवसेनेला दिला. नामांतरासाठी अनेक महिन्यांपासून केंद्राकडे पाठपुरावा करित आहे. माजी व आजी उड्डाणमंत्र्यांशी चर्चा केली. फक्त औरंगाबादच्या विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न नाही तर देशातील १३ विमानतळाचे प्रस्ताव आले आहेत. या शिवाय इतरही प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता असून ते आल्यानंतर नामांतर होईल, असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..