उद्योजकांनी स्थानिक नागरिकांना प्राधाण्याने रोजगार उपलब्ध करावा :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; मुकुटबन येथील सिंमेट कंपनीत पालकमंत्र्यांनी दिली भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 16 फेब्रुवारी :- जिल्ह्यात कार्यरत खाजगी मोठ्या उद्योजक कंपन्यांनी शासन नियमांचे पालन करून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावे तसेच स्थानिक नागरिकांना आपल्या औद्योगिक कंपनीत प्राधाण्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या.
मुकूटबन येथील बिर्ला उद्योग समुहाच्या आर.सी.सी.पी.एल. सिंमेट कंपनीला काल पालकमंत्री यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. शिरसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकार सिंग भोंड, कंपनीचे युनिट प्रमुख अभिजीत दत्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्योजकांच्या सि.एस.आर. फंडचा उपयोग स्थानिक गाव व लगतच्या परिसारातील गावांना व्हावा, असे सांगितले. अभिजीत दत्ता व नवीन काकडे यांनी कंपनीच्या प्रगतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन जयंत व्यास यांनी केले.
यावेळी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….