चिचघाट आदिवासी आश्रमशाळेतील क्रिडा संकुल बांधकामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी ; आदिवासी आश्रमशाळेच्या क्रिडा संकुलातून देशासाठी खेळाडू घडावे :- पालकमंत्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 16 फेब्रुवारी :- चिचघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आकारास येत असलेल्या भव्य क्रिडा संकुलातून देशासाठी खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडून यवतमाळ जिल्ह्याचे नाव व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील चिचघाट शासकीय आश्रमशाळेच्या मैदानावर आदिवासी विभागातर्फे भव्य क्रिडा संकुल उभारण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाची पाहणी काल पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकाल्पाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद कचरे, उपअभियंता प्रविण कुळकर्णी, क्रिडा विभागाचे सचिंद्र मिलमिले उपस्थित होते.
या शासकीय आदिवासी आश्रमशाळील क्रिडा संकुलात 400 मिटर धावणपथ व इतर खेळाची मैदाने तयार करणे यासाठी 6 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत 400 मिटर धावणपथचे मातीकाम व खडीकरण, संरक्षण भिंत तसेच इतर मैदानाच्या खडीकरणाचे काम पुर्ण झाले असून इतर काम प्रगतीपथावर आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम करण्यात येत असून कामांची तांत्रिक पाहणी जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या निरीक्षणाखाली करण्यात येत आहेत. आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा संकुल उभारण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम राहील, असे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा विभाग व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अजबच..! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल….
मुलगा मुख्यमंत्री झाला..! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू…
‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….