मला जोड्याने मारा…; किरीट सोमय्यांनी ऐन पत्रकार परिषदेत काढली चप्पल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील १९ बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते.
यासंबंधी त्यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या.
दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले दाखवण्याचं आव्हान केलं होतं. आणि ते न सापडल्यास जोड्याने मारणार असल्याची भाषा केली. यावर किरीट सोमय्यांनी थेट पायातील चप्पल काढून दाखवली. आणि मी केलेले दावे खोटे ठरवल्यास माझ्याच चप्पलीने मारा,असं ते म्हणाले.
बोलता बोलता सोमय्यांनी काढली चप्पल…!
माझ्या विरोधात तक्रार करायची असेल तर करा. रश्मी ठाकरे यांनी सदर ग्रामपंचायतीला माफीनाम्याचं पत्रंही लिहिलं आहे. जोड्याने किरीट सोमय्यांना मारणार असााल तर मारा, माझ्याच जोड्याने मारा. मी तयार आहे! असं ते म्हणाले. मी माझी चप्पल संजय राऊत यांच्या हातात द्यायला तयार आहे. फक्त राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं. तसं झाल्यास मी जोड्याने मार खाई, असं सोमय्या म्हणाले.
‘कशाला खोली सॅनिटाईज करता, मी येतो तुरुंगात!’
संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर ट्वीट केलं. यामध्ये बाप-बेट्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं ते म्हणाले. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचं ते म्हणाले. मला जेलमध्ये टाकणार असाल तर, मी स्वत: येतो, असं ते म्हणाले. कशाला खोली सॅनिटाईज करता, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. एका दमडीचा घोटाळा काढून दाखवा, असं चॅलेंज त्यांनी केलंय. माझ्यावर १३ केसेस आहेत. १४ वी पाईपलाईनमध्ये आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….