आम्ही संजय राऊतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत :- नाना पटोले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काल शिवसेना संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या मंत्र्यांच्या मागे ईडीचे हत्यार मागे घेऊन लागलेल्या सोमैयांना आणि दस्तुरखुद्द ईडीला संजय राऊत यांनी अक्षरशः धु-धु धुतले आहे.
काय यांच्या बापाच्या राज्य आहे का ? तो मुलुंडचा भडवा, दलाल असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमैयांचे वाभाडे काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. या संदर्भात संजय राऊत यांनी काही नेत्यांवर केलेल्या
आरोपांना नाना पटोलेंनी पाठींबा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले का? असा संतप्त सवालही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.
एवढंच नाही तर केंद्र सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढेमोठं धाडस करू शकत नाहीत. राऊतांनी काही पेपर्स यासंदर्भात गोळा केले आहेत आणि हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे, त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..