१० मार्चनंतर मंत्रीमंडळात बदल , दिल्लीवारीनंतर पटोलेंचं वक्तव्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. येत्या १० मार्चला या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास १३ महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याचा दावा केला होता.
यानंतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही १० मार्चचा उल्लेख केला आहे. नुकतेच नाना पटोले दिल्लीवारीवरून माघारी आले आहेत. हायकमांडसोबत त्यांची खलबलं झाल्याची माहिती मिळत आहे. याला खुद्द त्यांनीच भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात दुजोरा दिलाय.
सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली असून 10 मार्चनंतर हे काम करणार असल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यानिमित्ताने १० मार्चची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता पटोलेंनीही उडी घेतलीय.
भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील. त्यामुळे नाना पटोले 10 मार्चनंतर नेमकी कोणती पावले उचलणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..