कधीकाळी राज ठाकरे सोबत बसणाऱ्या शिशिर शिंदेवर आज शिवसेनेत मागे उभा राहण्याची आली वेळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक आरोप केले. याच पत्रकार परिषदेत शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेने आपले सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार यांना एकत्र करुन ही पत्रकार परिषद घेतली.
यावरुन भाजप-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता यामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मनसे (MNS) सोडून शिवसेनेत गेलेल्या शिशिर शिंदेंना (Shishir Shinde) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेय खोपकर म्हणाले, “मनसे सोडून गेल्यावर दुसऱ्या पक्षात नेत्यांची पण काय गत होते ते या छायाचित्रावरुन दिसते. राज ठाकरेंच्या पंगतीत बसणारे शिशिर शिंदे, आजच्या टुकार पत्रकार परिषदेत नगरसेवकाच्या मागे उभे होते, किती दुर्देव!” असे म्हणत त्यांनी शिशिर शिंदेंवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना भवनात आमदार-खासदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा; अन्यथा तुम्हाला टाईट करण्यात येईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी दिल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या वेळी राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे. तसेच PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यापासून १२ हजार कोटी रुपयांची जमीन मोहित कंबोजने १०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याचबरोबर निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली आणि याच वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..