दिलासा : उमरखेड तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाणेंसह इतरांना अंतरिम जामीन मंजुर ;# घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार प्रकरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाणे सह इतर पाच जणांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
या मागील पुष्ठभुमी अशी की,
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम ५८(२) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता. परंतु त्यावर ठोस कार्यवाही होत नव्हती. या बाबत तक्रारकर्त्याने यांनी अँड. अरमान अंबेजोगाईकर यांच्या मार्फत दोन वेळा उच्च न्यायलयाच्या नागपुर खंडपिठात धाव घेवुन कार्यवाहीची मागणी केली होती. न्यायलयाच्या बडग्याने नगर विकास मंत्रालयाने अखेर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार मुख्याधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलीसांनी ११ जणांविरूध्द
४२०,४०९,४६५,४६७,४६८,४७१,३४नुसार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, फिरोजखान आजाद खान,( मॅकनिक) मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस, नांदेड. तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे त्याच बरोबर, लेखापाल सुभाष भुते ,आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांचा समावेश होता.
त्यामुळे आरोपींनी अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार यांनी अँड.आदित्य माने यांच्यामार्फत पुसद न्यायालयात धाव घेतली.अखेर त्यांना पुसद न्यायालयाने अंतरिम जमीन दिल्याने उमरखेड तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाणेंसह इतरांना दिलासा मिळालं आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….