अनिल देशमुखांशी संबंधित १२ ठिकाणी सीबीआयचे छापे ; दस्तावेज घेतले ताब्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपुरातील व्यक्तींच्या कार्यालय आणि निवासस्थानासह अन्य १२ ठिकाणी सीबीआयने छापे घातले.
ही छापेमारी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
सीबीआयने केलेली ही सातवी कारवाई असल्याचे समजते. मुंबई, दिल्ली आणि नागपुरातील सीबीआयचे जवळपास ५१ अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी दहा पथके तयार केली होती. रामदासपेठेतील बाहेती यांच्या घरावर आणि कार्यालयावर, सदरमधील एका सीएच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. येथून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ७ कोटींचा व्यवहार झाला होता. त्यासंबंधाने हे छापे टाकण्यात आल्याची चर्चा आहे. आधी हा व्यवहार ४ कोटींचा असल्याची चर्चा होती. आता ती रक्कम सात कोटी असल्याची माहिती पुढे आली आहे.
सायंकाळपर्यंत कारवाई
कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये देशमुख यांचे सीए विशाल खटवानी यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात सीबीआयचे पथक धडकले. सीए खटवाणी शेअर ट्रेडिंगशीही संबंधित आहेत. तेथे पथकाने काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. तपासणीत काही डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….