शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा “या” दिवशीपासुन सुरु होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिर्डी :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली .
नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत होत आहे.
सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये बंगलुरूसाठी 02, दिल्ली 01, हैदराबाद 01, चेन्नई 01 अशा पाच विमानफेर्या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा सुरु होणार आहे.
पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरवरुन शिर्डीला येईल व तेथून पुणे येथे जाणार आहे.
ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात, यावरच ही सेवा यामार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….