उद्धव ठाकरेंच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल :- आमदार रवी राणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- काल (०९ फेब्रुवारी) अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी महानगपरपालिक आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
याप्रकरणी दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. भाजप खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती मतदार संघात हा प्रकार घडला. याचे पडसात उटत सोमवार १५ फेब्रुवारी पर्यंत अमरावती प्रशासकीय कर्मचारी यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्या सोबत दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी युवा स्वाभिमानचे पाच कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे असा आरोप केला. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात शाई फेक करण्याच्या अनेक घटना घडल्या परंतु माझ्यावर त्यांनी ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यामागचे राजकारण काय ? असा सवाल त्यांनी केला.
संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून मला अटक करायला सांगितले. हिम्मत असेल तर संजय राऊत यांच्यावर देखील ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा असे आव्हान यावेळी राणा यांनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..