गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस-भाजप आमने-सामने ; पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना पसरवण्यात कॉंग्रेस आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यावर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान मोदींच्या या वक्तव्याविरोधात कॉंग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन छेडले आहे. (Congress agitation outside Gadkari house)कॉंग्रेसचे अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजप आमने-सामने आले आहेत.
कॉंग्रेस कार्यकर्ते अतुल लोंढे यांनी नागपूरचे खासदार म्हणून नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी नरेंद्र मोदींना(Prime Minister Narendra Modi) महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागण्याची विनंती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा अभिमान ठेवायला हवा. असेही ते म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपही याठिकाणी आंदोलन करत आहे. कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते याठिकाणी जमले भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
गेल्या ५० वर्षांत ज्यांनी देशाच्या विकासासाठी काही काम केले नाही, असे निकम्मे जर नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करत असतील ,तर भाजप त्यांचे आंदोलन फोडून काढेल. असा इशाराही भाजपने दिला आहे. दरम्यान या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’ च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच “सोनिया जिसकी मम्मी हे वो सरकार निकम्मी हे”, “मोदी जी संघर्ष करे, हम तुम्हारे साथ हे”,अशा घोषणाही भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते याठिकाणी जमले असल्याचे भाजपने म्हटले आहे. मात्र यामुळे नागपूर शहरात या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..