सपाची खेळी ; योगींसाठी गोरखपुरचा गड जिंकण खड़तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून भाजप आणि समाजवादी पक्षांत सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
अखिलेश यादव यांनी योगी यांना रोखण्यासाठी मोठी खेळी केल्याचं समोर आलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर शहर मतदारसंघातून समाजवादी पक्षानं भाजपचे माजी नेते माजी नेते दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी सभावती शुक्ला यांना उमेदवारी देऊन योगींसमोर खडतर आव्हान उभं केलं आहे.
अभाविपपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे उपेंद्र दत्त शुक्ला यांनी ४० वर्षे भाजपचे काम केले. शुक्ला हे महत्त्वाचे ब्राह्मण नेते होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आहे.
दुसरीकडे गोरखपूरचे विद्यमान आमदार राधा मोहनदास यांना उमेदवारी नाकारून योगींना उमेदवारी देण्यात आली आहे. राधा मोहनदास यांची नाराजी आहे. त्याचाही फटक योगींना बसू शकतो. एकंदरातच योगींसाठी गोरखपूर जिंकणं खडतर असणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..