शनिवार , रविवार शाळा सुरु ठेवून शिल्लक अभ्यासक्रम भरून काढावा :- अजित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- शिक्षकांनी शनिवार आणि रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षकांना केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केले आहे.
अजित पवार म्हणाले, दोन वर्षे करोनामुळे मुलांना शाळेत जाता आले नाही. मात्र ही मुलं चांगल्या, स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावीत यासाठी तुम्ही स्वच्छ व सुंदर अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे. हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करणार आहे. पावणे सात कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या टीमने हे काम केले, पावणे तीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. ही जिल्हा आणि राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र यात सातत्य ठेवा अशी सक्त सूचना करत त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शनिवारी, रविवारी शाळा सुरु ठेवण्याच्या सुचना अजित पवारांनी स्वामी यांना दिल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..