मोठी बातमी ; लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी मुंबईला येणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनतर आता मोदी संध्याकाळी 4:30 पर्यंत मुंबईत दाखल होतील आणि लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….