आदित्य ठाकरे ७ व ८ फेब्रुवारीला विदर्भ दौऱ्यावर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे हे ७ आणि ८ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहे.
हा कुठलाही राजकीय दौरा नाही तर या दौऱ्यादरम्यान ते चंद्रपूर मधील तलावाबाबत पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलाची पाहणी आणि नागपूर जिल्ह्यातील वीज प्रकल्पांचे प्रदूषण आणि फ्लाय अॅशच्या प्रश्नावर आढावा घेणार आहे.
आदित्य ठाकरे सोमवारला दुपारी २ च्या सुमारास विशेष विमानाने नागपूर येथे येणार त्यानंतर कारने ते चंद्रपूरला रवाना होतील. चंद्रपुरच्या रामाळा तलावास ते भेट देणार आहेत तर बगड खिडकी, चांदा किल्ला येथे स्वच्छता अभियानाची ते पाहणी करतील. चंद्रपुर जिल्ह्यातील पर्यटनाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर रात्री नागपूरला परत येतील.
कोराडी व खापरखेड औष्णिक वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या प्लाय अॅशची विल्हेवाट लावण्याचा खुप मोठा प्रश्न आहे. कोराडी व खापरखेड्याच्या प्रदूषणाचा मुद्दा मध्यंतरी बराच गाजला होता. याविषयी आदित्य ठाकरे मंगळवारी आढावा घेणार. या परीसरात प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी पर्यावरण व ऊर्जा विभागाकडून संयुक्त योजना कार्यान्वित करण्याचा विचार आदीत्य ठाकरे बोलून दाखवण्याची शक्यता आहे.