“2024 पर्यंत सहन करू , पण आम्ही झुकणार नाही” :- संजय राउतांचा हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सुडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप राजकीय नेते करत आहेत. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ईडीकडून संजय राऊत यांंचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्यावर फसव्या भूखंडाशी संबंधित प्रकरणावरून अटक केली आहे.
प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने राजकीय पडसादही उमटत आहेत. आधी आमिष दाखवण्यात आले, अनेक ऑफर्स देण्यात आल्या. मग घाबरवले गेले, धमकावले गेले, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपट पुष्पामधील डायलॉगही त्यांनी ट्विट केला आहे.
आमच्या कुटूंबाला देखील धमकावले गेले. पण, आम्ही दुर्लक्ष्य केले. त्यातच केंद्रीय यंत्रणांना आमच्या पाठीमागे लावण्यात आले. परंतु, आम्ही झुकणार नाही. हे असंच 2024 पर्यंत चालत राहिल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले आहे. हिंदी भाषेतून त्यांनी हे ट्विट केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आहे. आम्ही त्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू. त्यांना काय सर्च करायचे आहे ते करू द्या. मी त्यांना विचारत आहे कुछ मिला क्या?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच प्रवीण राऊत यांच्यावर 1 हजार 34 कोटी रूपयांच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….