सुनील डिवरे हत्या प्रकरण ; यवतमाळमध्ये नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शिवसैनिकांनी केला “रास्तारोको आंदोलन”; माजी मंत्र्यांच्या आश्वानाने आंदोलन मागे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- तालुक्यातील भांब (राजा) येथील माजी सरपंच व यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
दुसर्या दिवशी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांन नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर राडा घातला. त्यांनी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरल्याने वाहतूक खोळंबली होती.
मास्क घातलेल्या तिघांनी गुरुवारी रात्री आठदरम्यान शिवसैनिक सुनील डिवरे यांना गोळ्या झाडून हत्या केली. तसेच त्यांच्यावर कुर्हाडीचे वार केले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर भांबराजा व परिसरातील नागरिक संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असली तर अजून काही आरोपी फरार असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्याप कळू शकले नाही. सुनील डिवरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. जोपर्यंत सर्व आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसैनिकांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले. त्यांनी रस्त्यावर टायर जाळले. त्यामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली होती. त्यानंतर अधिकची पोलिस कुमक मागवून आंदोलकांना पांगवण्यात आले.
आमदार संजय राठोड यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा –
शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी सुनील डिवरे यांच्या नातेवाईक, ग्रामस्थ व शिवसैनिकांना फोनवरून आवाहन करीत रास्तारोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले असून एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..