अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात, 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला.
या संदर्भात आज सुनावणी झाली. त्यावेळी ईडीला जामीन अर्जावर रिप्लाय फाईल करण्यासाठी इडीने आणखी वेळ मागितला, न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे या अर्जावर आता पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीण अर्जावर आज सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणातील सर्व केसची एकाच न्यायाधीशा समोर सुनावणी होणार असल्याने आज न्यायालयाने या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींची यादी बनवली त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळा नंबर देण्यात आला त्यामध्ये माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना 15 क्रमांक देण्यात आला आहे.
ऋषिकेश, देशमुख यांना 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजावला आहे.ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा आरोप ईडीने केला आहे. आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.
९ फेब्रुवारीपर्यंतचा ईडीला वेळ
अनिल देशमुखांतर्फे यापुर्वीही जामीनासाठी वेळोवेळी अर्ज करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता, रेग्युलर जामीनसाठी त्यांनी नव्याने अर्ज केला आहे. पीएमएलए कोर्टात आज जामीन अर्जावर सुनावनी झाली. ईडी तर्फे देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावनीसाठी वेळ मागण्यात आला आहे. त्या अनुशंगाने न्या. आर एन रोकडे याने ९ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ ईडीला दिला असुन या प्रकरणाची पुढील सुनावनी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..