शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक ; ईडी ची मोठी कार्यवाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ही कारवाई केली आहे.
प्रविण राऊत एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरुआशिष कंस्ट्रक्शनमध्ये संचालक आहेत.
गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीच्या पथकानं काल (मंगळवारी) प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीनं राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे.
याआधी प्रविण राऊत यांचं नाव डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळ्यात आलं होतं. प्रविण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाखांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं. याचा वापर त्यांनी मुंबईतील दादरमध्ये एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….