कथित घरकुल घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयाची दखल ; संबंधीत दोषींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की , पुसद शहरामध्ये नगर परिषद पुसद चे पदाधिकारी तथा राजकीच पुढारी यांनी स्वतःचा आर्थीक फायदा करवून घेण्याकरिता शासनाकडून मिळणा – या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी नमुना ड करिता मोजणी फी ३५० / रू . भरणा स्टॉर एजेंसी पुसद यांचे कडे करावा असे जाहीर आवाहन केले . त्यानुसार पुसद येथील नागरिक तसेच सामाजीक कार्यकर्ते तथा मानव अधिकार सुरक्षा परिषद चे राष्ट्रीय सचिव रशीद खान रहीम खान पठाण रा . वसंत नगर , पुसद यांनी सुध्दा मोजणी कामी ३५० / – रू . चा भरणा केला तदनंतर मोजणी फी ची दिलेली पावती ही बनावट असल्याचे निष्पन्न होवून फसवणुक झाली असल्यामुळे आरोपींनी स्वत : चे आर्थीक फायदयाकरिता आपसी संगणमत करून भा . द . वी . चे कलम ४०५ , ४०६ , ४२० , ४६३ , ४६४ , ४६८ , ४७० , ४७१ , ४७४ , ५०६ सह ३४ गुन्हा केला असल्यामुळे रशिद खान रहीम खान पठाण यांनी पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे रिपोर्ट दिला परंतु त्यावरून कार्यवाही झाली नसल्यामुळे पुसद येथील न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी साहेब पुसद यांचे न्यायालयात रितसर फौजदारी फिर्याद दाखल केली परंतु त्या प्रकरणात न्यायालयाने गुन्हयाची दखल न घेतल्यामुळे त्या आदेशा विरूध्द रशिद खान पठाण यांनी वि . जिल्हा न्यायाधिश साहेब पुसद यांचे न्यायालयात फौ . रिव्हीजन क . १ ९ / २०२१ हे प्रकरण दाखल केले त्या प्रकरणात वि . जिल्हा न्यायाधिश क . २ श्रीमान फड साहेब यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून याची दखल घेत सदर घोटाळयातील जवाबदार सौ . अनिताताई मनोहर नाईक तत्कालीन नगराध्यक्ष नगर परिषद पुसद , सौ . पुजा मॅडम , मिर्झा राशिद बेग कुट्टुस बेग , डॉ . मोहंमद नदीम अब्दुल रशिद , अॅड . भारत मधुकरराव जाधव , राजु मल्हारी सोळंके , सौ . दिपाली भगवान धुळे , सौ . पंचशिला राहुल कांबळे , शेख कयुम शेख मुनाफ , मोहंमद साबीर अब्दुल सत्तार सर्व रा . पुसद यांना दिनांक १८/०२/२०२२ रोजी न्यायालयात हजर हारण्याचे आदेशीत करून तश्या प्रकारचे लेखी सुचनापत्र न्यायालया मार्फत पाठविण्यात आलेले आहे , सदर आदेशामुळे पुसद येथील राजकीच पुढारी यांचे धाबे दणाणले आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….