“धोका टळलेला नाही” ; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- धोका अद्याप संपलेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओनं पुन्हा एकदा म्हटलं आहे की जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे.
कोरोना निर्बंध (Covid ) हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिल्याचं कळतंय.
अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत. कारण अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे, असं डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन म्हणाल्यात.
मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे.
आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जावं. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास सांगावं, असं WHO चे सरचिटणीस म्हणाले
या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असं नाही. कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकलं आहे, असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमिक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. हा प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..