48 हजार कोटींचा जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्राला साडेपाच हजार कोटींचा परतावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्राने चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातील 48 हजार कोटी रुपये महाराष्ट्रातून गेले आहेत. त्याबदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले आहेत.
अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जानेवारी 2022 मध्ये जीएसटीची वसुली सर्वोच्च झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पण याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तू व सेवाकराची वसुली वाढल्यामुळे राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढविणे आवश्यक आहे. वस्तू व सेवाकराच्या वसुलीतील नुकसानभरपाई राज्यांना मिळण्यास पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नसल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी अर्थमंत्र्यांना भेटावे असे आवाहनही त्यांनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..