ऑफलाइन परीक्षेविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पुण्यातही पडसाद उमटले. पुण्यातील विद्यार्थ्यांनीही एकत्र येऊन ऑफलाईन परीक्षेला विरोध केला
शिक्षण ऑनलाइन झालेले असताना परीक्षा ऑफलाइन का, मंत्री-अधिकाऱ्यांच्या बैठकाच ऑनलाइन होतात तर आमच्या परीक्षा ऑफलाइन का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.
राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. तर फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांविरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडून मोठय़ा संख्येने येऊन विरोध करण्यात आला. पुण्यातील विद्यार्थ्यांनीही ऑफलाइन परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. परीक्षा नको अशी भूमिका नाही, पण अभ्यासक्रम कमी केलेला असूनही तो पूर्ण शिकवून झालेला नाही. ऑनलाइन पद्धतीने अध्यापन झालेले असल्याने परीक्षा ऑफलाइन कशासाठी हा प्रश्न आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात किंवा गेल्यावर्षीप्रमाणे मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….