“काँग्रेस पक्षाला कोणीही पराभूत करू शकत नाही, फक्त काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकतो” :- सिद्धू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंडीगड :- पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीवर भाष्य केलं. काँग्रेस पक्षाला कोणीही पराभूत करू शकत नाही, फक्त काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकतो असं सिद्धू म्हणाले आहेत.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) रणधुमाळीला सुरूवात झाली असून, यामध्ये पंजाब हे एक महत्वाचं राज्य आहे. पंजाबमध्ये काँग्रेसलं यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला नुकसान होऊ शकतं असं चित्र निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि सिद्धू यांनी राहुल गांधींना राज्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी यासंदर्भातील निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेतील असं सांगितलं होतं. सिद्धूंनी यावेळी शिरोमणी अकाली दलावर सुद्धा टीका केली आहे. बिक्रम सिंग मजिठिया यांना शिरोमणी अकाली दलाने सिद्धूंच्या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “बिक्रम सिंह मजिठिया हे पर्चा माफिया आहे.”

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….