“वाइन आणि दारू यामध्ये फरक आहे” उपमुख्यमंत्री पवार यांचे विरोधकांना स्पष्टीकरण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- वाइन आणि दारू यामध्ये फरक आहे, त्यामध्ये उगाच गैरसमज केला जातोय. आपल्याकडे वेगवेगळ्या फळांपासून वाइन तयार केली जाते. आपल्याकडे वाइन पिण्याचे प्रमाण कमी आहे. आम्ही सरकारमध्ये असताना जनतेच हित पाहून निर्णय करू.
मात्र, काही लोकांनी व्हीडीओ काढून सरकार विरोध प्रचार करत आहेत, जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टिका केली.
मॉल, सुपर मार्केट आणि किराणा स्टोअर्समध्येही वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर भाजपने मात्र जोरदार टीकास्त्र सोडले होते. सरकार पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारूला सवलती देत असल्याचे भाजपने म्हटले होते. यावर अजित पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. वाइन आणि दारुमधला फरक ओळखला पाहिजे, असे भाष्य त्यांनी केले आहे.
पवार म्हणाले की, जेवढी वाइन तयार होते तेवढी आपल्याकडे विक्री होत नाही. बाहेरच्या राज्यात किंवा परदेशात निर्यात केली जाते. काही देशात तर पाण्याऐवजी वाइन घेतात. काहींनी जाणीवपूर्वक ‘मद्यराष्ट्र’ म्हटल आहे. मध्यप्रदेशात तर घरपोच वाइन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. वाइन विकण्यासाठी काही नियम अटी घालून परवानगी दिली आहे. पुढच्या मंत्रीमंडळात त्याची नियमावली तयार झाल्यानंतर अंमलबजावणी होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….