काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या घरी मनोरुग्णाची औषधी पाठवली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या मोदी बाबतच्या वक्तव्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते.
याप्रकरणी आता बीड मधील सुधीरभाऊ मुनगंटीवार युवा प्रतिष्ठान आक्रमक झालं आहे. प्रतिष्ठानचे योगेश भागवत यांनी नाना पटोले यांना मनोरुग्णाला दिलं जाणारं औषध पाठवलं आहे. पटोले यांच्या पत्त्यावर हे औषधांचं पाकिट पोस्ट करण्यात आलं आहे. नाना पटोले यांनी अलिकडेच मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल एक वक्तव्य केलं होतं.
मात्र भाजपाच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केल्याचा आरोप केला. मागच्या काही दिवसांपासून यावर भाजपा आंदोलनही करत आहे. याप्रकरणी पटोले यांनी स्पष्टीकरणही दिलं. ते वक्तव्य पंतप्रधानांविषयी नव्हतं, तर एका गावगुंडाबद्दल होतं, असं ते म्हणाले होते. भाजपा मात्र अजूनही विरोध करत आहे.