“माझ्यावर पडलेल्या लाठ्या ब्रिटिश राजवटीच्या शवपेटी वरचे खिळे ठरतील” :- लाला लजपत राय यांचे अखेरचे शब्द…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- आज पंजाब-केसरी लाला लजपत राय यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने त्यांचा जीवनपट आणि त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी जाणून घेऊ.
लाला लजपतरायांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल व आई गुलाबदेवी यांच्या पोटी, मुक्काम धुडीके, पंजाब (ब्रिटीशकालीन) येथे झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जहाल मतवादी नेते म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे. अखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा, आर्यसमाज चळवळीतून त्यांनी कार्य केले. तसेच त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९२० च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून लालाजी निवडून आले. लाहोर येथे १९२१ साली त्यांनी लोकसेवक मंडळ या कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. १९४७ च्या फाळणीनंतर ज्या विद्यालयाचे नामांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर असे करण्यांत आले त्या मूळ दयानंद ऍंग्लो-वैदिक स्कूल, लाहोरची स्थापना लाला लजपतराय व महात्मा हंसराज यांनी १८८६ साली केली होती. सायमन कमिशन ब्रिटिश सरकारने १९२८ साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील राजकीय परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयोग स्थापन केला. मात्र यात एकही भारतीय व्यक्ती नव्हती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला.

या विरोधात निदर्शने केली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशनचे सदस्य लाहोरला आले होते. तेव्हा त्याविरोधात लाला लजपतराय यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांने जमावासमोर भाषण करीत असलेल्या लालाजींवर लाठीहल्ला केला.

यावेळी लालाजी गरजले, “आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटीवरील खिळे ठरतील.” लालाजींना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. यामुळे त्यांना दिनांक १७ नोव्हेंबर १९२८ रोजी वीरमरण आले. मात्र डॉक्टरांनी लालाजींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे जाहीर केले. लालाजींच्यावर झालेल्या या हल्याचा बदला क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी दिनांक १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरच्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉंडर्सवर गोळ्या घालून घेतला.

पॉलिटिक्स स्पेशल च्या वतीने लाला लजपत राय यांचा जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..