किरीट सोमय्या अधिकाऱ्याचा खुर्चीवर का बसले होते ; मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले चौकशी आदेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाइल्स तपासल्याने नवीन वादाला तोंड फुटले. सोमय्या यांनी माहिती अधिकारात फाइल्स तपासण्याची परवानगी घेतली नसेल, तर त्यांच्यावर शासकीय कार्यालयात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याबद्दल आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
सोमय्या यांनी सोमवारी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते. सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, त्यासाठी परवानगी दिली होती का, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सावंत यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली.
यानंतर अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. सोमय्या हे थेट त्या कार्यालयात कसे गेले, त्यांना संबंधित फाईल कोणत्या अधिकारात दाखवली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्याची चौकशी करण्याचा आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिला आहे. त्यामुळे सोमैय्या यांच्यावर ठाकरे सरकार काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..