दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे नवी कार्यकारिणी जाहीर ; सहा जानेवारीची कार्यकारिणी बरखास्त ; नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अझरउल्ला खान यांची निवड..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :-
शहरातील दैनिकांच्या अधिकृत वार्ताहर यांची एकमेव संघटना असलेल्या दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाची २०२२ या चालू वर्षाचे कार्यकारिणी नव्याने मंगळवारी (दि, २५) रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार सहा जानेवारी रोजी झालेली वार्ताहर संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नव्या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकदुत चे तालुका प्रतिनिधी,अझहरउल्ला खान यांची अध्यक्षपदी, तर लक्ष्मीकांत नंदनवार यांची सचिवपदी बहुमताने निवड करण्यात आली. दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाची २०२२ या वर्षाची कार्यकारीणी दरवर्षीप्रमाणे यंदाही सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनी जाहीर करण्यात आली होती. संघाच्या घटनेनुसार बिनविरोध झालेल्या कार्यकारिणीला सर्वांची मान्यता मिळाली असताना, नवनियुक्त पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारल्या बरोबरच संघामध्ये दुही निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर संघाच्या सदस्यांनाही विश्वासात न घेता, तसेच कुठली सभा किंवा बैठक न घेता, संघाच्या ‘व्हाट्सअप ग्रुप’ मधून काही सदस्यांना रिमूव केले. अगदी दोन दिवसांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या एककल्ली कारभारामुळे संघातील सदस्यांमध्ये असंतोष उमटला. परीणामी एकतीस सदस्य असलेल्या संघाच्या कार्यकारणीमधील २५ सदस्यांनी अध्यक्ष व सचिव मनमानी कारभाराला तीव्र नापसंती अशाही परिस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघाला विश्वासात न घेता, संघाच्या बँक खात्यातून परस्पर ३० हजार रुपयांचा विड्राॅल केला. यावर १६ जानेवारीला झालेल्या तातडीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे ‘माफी नाट्य’ रंगले परंतु ते औटघटकेची ठरले. संघाचे अध्यक्ष व सचिव यांनी १५ सदस्यांना व्हाट्सअप ग्रुप मधून रिमूव करून परस्पर वेगळी कार्यकारिणी जाहीर केली. यावर सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करून २५ जानेवारी रोजी येथील विश्रामगृहावर संघाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत ६ जानेवारी रोजी झालेली कार्यकारणी बरखास्त करण्यात येऊन, नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी, अझहरउल्ला खान, सचिवपदी लक्ष्मीकांत नंदनवार, उपाध्यक्ष, नीळकंठ धोबे, कार्याध्यक्ष, वसंत देशमुख, कोषाध्यक्ष डॉ, विशाल माने. तर सचिव म्हणून अंकुश पानपट्टे यांची बहुमताने निवड करण्यात आली. या बैठकीला दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे संस्थापक सदस्य प्रशांत भागवत. प्रदीप इंगोले, रवी भोयर, सलमान खान, वेंकटेश पेन्शनवार ताहेर मिर्झा, अविनाश मुन्नरवार, अजय कानडे, सागर शेरे, गजानन भारती, शैलेश ताजवे आदिसह विविध दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….