सव्वा दोन वर्षात मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले…? चंद्रकांत पाटलांचा सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर एक सर्व्हे केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे. हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील असा चिमटाही पाटील यांनी काढला.
कोल्हे गोडसेशी सहमत आहेत का?
यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने त्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी एक अभिनेता म्हणून करणे यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. नथुराम गोडसेंच्या विचारांशी ते सहमत आहेत का ते त्यांनी जाहीर करावं. एक अभिनेता कुणाचीही भूमिका करू शकतो. उद्या अफझल खानाचीही भूमिका करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….