अमरावतीत बनणार जगातला सगळ्यात लांब स्कायवॉक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित Skywalk स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे.
स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. अमरावतीच्या चिखलदरा येथे होणाऱ्या या स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले होते. मात्र, आता हे अडथळे दूर झाले आहेत. केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिली आहे.
खा. नवनीत राणा यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार चिखलदरा येथील रखडलेल्या स्कायवॉकच्या Skywalk उर्वरित कामाला मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्णत्वास येणार असून पर्यटन वाढून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील एकात्मिक कार्यालयाने नुकतेच याबाबत एक पत्र संबंधित कार्यालयाकडे व खा. राणा यांच्याकडे पाठविले आहे. खा. नवनीत राणा यांनी या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चिखलदर्याच्या रखडलेल्या स्कायवॉकच्या कामा संदर्भात माहिती दिली होती व उर्वरित काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती. वने व पर्यावरण खात्याच्या हिरव्या झेंडीशिवाय हे काम अडलेले आहे.
मात्र, नव्याने प्रेषित केलेल्या पत्रानुसार आता चिखलदरा येथील Skywalk स्कायवॉक संदर्भातील सर्व परवानगी व परवाने मिळण्यासंदर्भातील अडथळे दूर झाले असून काही अटी व शर्तींच्या आधारे आता या विकासकामाला मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे चिखलदरा येथील रखडलेल्या स्कायवॉकच्या उर्वरित निर्माणकार्याला लवकरच प्रारंभ होऊन हा स्कायवॉक आता पूर्णत्वास जाणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व पर्यटन आणि रोजगार निर्मितीच्या विकासात्मक दूरदृष्टीने पूर्णत्वास येणार्या या स्कायवॉकमुळे विदर्भाचे नंदनवन असणार्या चिखलदरा येथील पर्यटनाला चालना मिळेल व पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीत वाढ होईल. आशिया खंडातील तिसर्या क्रमाकांच्या या स्कायवॉकमुळे चिखलदर्याच्या पर्यटन विकासात भर पडेल.