टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मेलबर्न – भारतात महिलांच्या टेनिसला गती देणारी व एक भारतीय महिला टेनिसपटूही जागतिक टेनिसवर वर्चस्व गाजवु शकते हे सिद्ध करणारी टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा हीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
यंदाच्या मोसमाअखेरीस आपण निवृत्ती घेणार आहोत, असेही तीने जाहिर केले आहे.
येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानियाने हा निर्णय जाहीर केला. मिर्झा आणि तिची युक्रेनची सहकारी जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हाकियाच्या जोडीकडून एक तास 37 मिनिटे चाललेल्या सामन्यात 4-6, 6-7(5) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह खेळणार आहे.
हा माझा कारकीर्दीतील अखेरचा मोसम असून त्यावेळी मी निवृत्त होणार आहे. यंदाच्या मोसमात मी शक्य त्या सर्व स्पर्धा खेळणार असून त्यानंतर मात्र, मी थांबणार आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. त्याला सोबत घेत स्पर्धांसाठी सतत प्रवास करणे शक्य होत नाही. त्यातच करोनाचा धोका असूनही प्रवास करणे खूपच धोक्याचे आहे. त्यामुळे कुठेतरी कारकीर्द थांबवणे गरजेचे आहे, असे सानियाने सांगितले आहे.
खूप वर्षे सातत्याने खेळत आहे. आता वय बोलू लागले आहे. शरीरही साथ देत नाही, तंदुरुस्तीचे प्रश्नही कायम सतावतो. मला गुडघ्याच्या दुखापतीनेही सातत्ये त्रस्त केले आहे. त्यामुळे आता नव्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहीजे. मी पराभूत मानसिकतेने हे सांगत नसून प्रत्येक खेळाडूला कुठेतरी थांबावेच लागते, असेही सानियाने म्हटले आहे.
सानिया 2003 सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत आहे. तीने पाकिस्तानचा प्रख्यात क्रिकेटपटू सोएब मलिकशी विवाह केल्यानंतरही ती विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..